महत्वाच्या बातम्या

 नागपूर जिल्हात हत्तीरोग दुरीकरण मोहीम प्रारंभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्हयात ऑगस्ट २०२३ दरम्यान हत्तीरोग दुरीकरण करण्याकरीता हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहिम राबविण्यात येत आहे. लेमदेव पाटील महाविद्यालय मांडळ येथे हत्तीरोग दुरीकरण मोहिम-२०२३ या कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय प्रारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकडे यांच्याहस्ते करण्यात आला.

यावेळी अध्यक्षांनी हत्तीरोग मोहीम यशस्वी करण्यासाठी स्वतः हत्तीरोग गोळयाचे सेवन करुन हत्तीरोग दुरीकरण करण्यासाठी गोळयाचे महत्व पटवून दिले व प्रातिनिधीक स्वरुपात दोन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गोळगा खाऊ घातल्या. तसेच हत्तीपाय रुग्णांची पायधुनी करुन विकृती व्यस्थापनाचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हत्तीरोग अधिकारी मोनिका चारमोडे यांनी केले.

मोहिमेत जिल्ह्यातील हिंगणा, नागपूर, कामठी, कुही, उमरेड, भिवापूर या तालुक्यात घरोघरी जाऊन आता आगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत ट्रिपल ड्रग थेरेपी अंतर्गत हत्तीरोग विरोधी डीईसी, डी आणि आयव्हरमेक्टीन आधी गोळ्यांचा उपचार समक्ष करण्यात येत आहे. या मोहिमेत दोन वर्षावरील लाभार्थ्यांच्या वयोगटानुसार गोळया सेवन करणे आवश्यक आहे. तसेच २ वर्षापेक्षा कमी वयोगटाच्या मुलाना, गर्भवती माता गंभीर आजारी रुग्णांना उपरोक्त उपचारातून वगळायचे आहे. या मोहिमेत उपरोक्त औषधोपचाराचे फक्त वितरण करण्यात येणार नसून प्रत्यक्ष स्वतः समक्ष पात्र लार्भांथ्यांना औषधी खाऊ घालण्यात येणार आहे. देशातून हत्तीरोग दुरीकरणाचे उद्दीष्ट सन २०१७ पर्यंत ठरविण्यात आल्यामुळे औषध घेण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायधने आणि वैद्यकिय अधिकारी डॉ.नितीन राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. रूपेश नारनवरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सभापती श्रीमती मोटघरे, उपसभापती तळेकर, जिल्हा परिषद सदस्य तथा जनआरोग्य समिती अध्यक्ष मनिषा फेंडर तसेच लेमदेव पाटील महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ.तितरमारे, सचिव चारमोडे, प्रा. रणदिवे, तसेच अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षा मेश्राम, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आदिती त्याडी, जागतिक आरोग्य संघटनेच्या जिल्हा समन्वयक डॉ. भाग्यश्री त्रिवेदी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ रुपेश नारनवरे, डॉ सचीन हेमके, उपस्थित होते.

मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद नागपूर तथा प्रा.आ.केंद्र मांडळ येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. राष्ट्रीय स्थरावर मोहिमेचे पर्यवेक्षण करण्याकरीता डॉ जॉन राजण मॅथ्यू, समुदाय आणि कौटुंबिक औषध विभाग एम्स, ऋषीकेश तसेच ९०.८ एफ. एम रेडिओचे प्रतिनिधी उपस्थित होते.





  Print






News - Nagpur




Related Photos