देसाईगंज शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमणावर चालला बुलडोजर


- मुख्याधिकाऱ्यांच्या  उपस्थितीत फव्वारा चौकापासुन सुरूवात 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : 
 शहरातील मुख्य मार्गांवर करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे रहदारीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. दरम्यान आज १५  मे रोजी सकाळपासूनच नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी  पोलिस संरक्षणात अतिक्रमण धारकांवर बुलडोजर चालवून धडक कारवाई करणे सुरु केल्याने अतिक्रमण धारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. 
देसाईगंज येथील फव्वारा चौक आणि सराफा लाईन मधील अतिक्रमण आज काढण्यात आले.  येत्या दोन दिवसात देसाईगंज येथिल मुख्य बाजार चौक ते मुख्य मार्गावरील   अवैध अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी  सांगितले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-15


Related Photos