महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही जिल्ह्या निर्मितीसाठी लाक्षणिक उपोषण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाहीला जिल्ह्याचा दर्जा देण्यात यावा, यासह अन्य मागण्यांना घेऊन सिंदेवाही जिल्हा निर्मिती कृती समितीतर्फे सोमवार २१ ऑगस्ट २०२३ ला शिवाजी चौकात लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी कृती समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिंदेवाहीचा समावेश नवनिर्मित जिल्ह्याच्या यादीत करण्यात यावा, सिदेवाही तालुका अपर जिल्हाधिकारी कार्यालयातून वगळण्यात यावा, सर्व समावेशक तालुक्याचा व न्याय विभागणीचा विचार करून मध्यवर्ती केंद्र असलेल्या सिंदेवाहीला जिल्ह्याचा दर्जा देण्यात यावा, नवनिर्मित जिल्ह्यात चिमूर, नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, सावली आणि मूल या तालुक्यांचा समावेश करण्यात यावा, नवनिर्मित जिल्ह्यातील सर्व समाविष्ठ जनता, शासन व प्रशासनाला सोयीचे व मध्यवर्ती ठिकाण म्हणून सिंदेवाहीचा विचार करण्यात यावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. 

यावेळी आंदोलनात मनोहर पवार, तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष रमाकांत लोधे, नागराज गेडाम, परसराम मेश्राम, विद्या धुळेवार, वंदना गजभिये, विलास गंडाटे, जयदेव श्रीरामे, भूषण गजभिये, दीपक पालपत्तुलवार,सदाशिव मेश्राम रत्नापुर, परसराम सलामे, दीपक बारसागडे, पदाधिकारी, सदस्य आणि तालुक्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos