महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२२ ऑगस्ट महत्वाच्या घटना

१६३९ : ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने मद्रास (आताचे चेन्नई) शहराची सुरवात केली.

१८४८ : अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला.

१९०२ : कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना.

१९०२ : मोटार वाहना मध्ये फिरणारे थिओडोर रूझवेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती होते.

१९४१ : दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने लेनिनग्राडला वेढा घातला.

१९४२ : दुसरे महायुद्ध – ब्राझीलने जर्मनी इटालीविरुद्ध युद्ध पुकारले.

१९४४ : दुसरे महायुद्ध – सोविएत युनियनने रोमानिया जिंकले.

१९६२ : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला.

१९७२ : वर्णद्वेषी धोरणाबद्दल झिम्बाब्वे ची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतुन हकालपट्टी करण्यात आली.

२२ ऑगस्ट जन्म

१६४७ : प्रेशर कुकर चे निर्माते डेनिस पेपिन यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट १७१३)

१८४८ : शिकागो डेली न्यूज चे स्थापक मेलविले एलिया स्टोन यांचा जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९२९)

१८९३ : अमेरिकन लेखक डोरोथी पार्कर यांचा जन्म.

१९०४ : सुधारणावादी चिनी नेते डेंग जियाओ पिंग यांचा जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९९७)

१९१५ : बंगाली नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक शंभू मित्रा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९९७)

१९१५ : इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे रचनाकार जेम्स हिलियर यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी २००७)

१९१९ : हिंदी कवी गिरिजाकुमार माथूर यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १९९४)

१९१८ : सामाजिक कार्यकर्त्या डॉ. बानू कोयाजी यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै २००४)

१९२० : हृदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्यविशारद डॉ. डेंटन कुली यांचा जन्म.

१९३५ : कथ्थक शैलीचे नर्तक अभिनेते पंडित गोपीकृष्ण यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९४)

१९५५ : अभिनेते आणि केंद्रीय मंत्री चिरंजीवी यांचा जन्म.

१९६४ : स्वीडीश टेनिस खेळाडू मॅट्स विलँडर यांचा जन्म.

२२ ऑगस्ट मृत्यू

१३५० : फ्रान्सचा राजा फिलिप (सहावा) यांचे निधन.

१६०७ : लंडन कंपनीची स्थापक बर्थलॉम्व गोस्नेल यांचे निधन.

१८१८ : भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १७३२)

१९६७ : जन्म नियंत्रण गोळीचे निर्मिते ग्रेगरी गुडविन पिंटस यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १९०३)

१९७८ : केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोमोके न्याटा यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १८९३)

१९८० : चित्रपट अभिनेते, निर्माते दिग्दर्शक किशोर साहू यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १९१५)

१९८० : मॅकडोनेल विमानाचे निर्माते जेम्स स्मिथ मॅकडोनेल यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १८९९)

१९८२ : क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार एकनाथ रानडे यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १९१४)

१९८९ : ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. कृष्णराव शंकर पंडित यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८९३)

१९९५ : संगीतकार, ट्रम्पेट व्हायोलिनवादक पं. रामप्रसाद शर्मा यांचे निधन.

१९९९ : मराठी चित्रपट रंगभूमीवरील अभिनेते सूर्यकांत मांढरे यांचे निधन.

२०१४ : भारतीय लेखक, कवी आणि नाटककार यू. ए. अनंतमूर्ती यांचे निधन. (जन्म: २१ डिसेंबर १९३२)





  Print






News - todayspecialdays




Related Photos