महत्वाच्या बातम्या

 वैभव कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांचे बॅडमिंटन स्पर्धेत यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : रोटरी क्लब बल्लारपूरच्या वतीने १९ व २० ऑगस्ट २०२३ रोजी तालुका क्रीडा संकुल विसापूर येथे आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये तालुक्यातील व जिल्ह्यातील नामवंत शाळांनी सहभाग घेतला होता.

त्यात वैभव कॉन्व्हेंट स्कूल, बल्लारपूरच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. या स्पर्धेत शाळेतील एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा विजेता साक्षम मदनलाल गौतम हा इयत्ता 8वीचा विद्यार्थी होता. १३ वर्षांखालील सक्षम मदनलाल गौतम आणि चंद्रेश सुरेश वर्मा हे देखील उपविजेते ठरले.

स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष हेमंत मानकर, सचिव सौ.रजिया खान, शाळेच्या संचालिका सुरेखा पांडे (मिश्रा) , मुख्याध्यापक विजय शिंदे , शालेय व्यवस्थापन समिती सदस्य फरजाना शेख, शिक्षक सनी माहेश्वरी, क्रीडा शिक्षक स्वप्नील डंभारे, पालक, सर्व शिक्षकवृंद विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.





  Print






News - Chandrapur




Related Photos