महत्वाच्या बातम्या

 आरसेटीच्या इलेक्ट्रीक मोटर रिवाइंडींग प्रशिक्षणाचा समारोप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : बॅंक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था अर्थात आरसेटीच्यावतीने इलेक्ट्रीक मोटर रिवाइंडींग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा नुकताच समारोप झाला.

या ३० दिवसांच्या प्रशिक्षणात २२ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. या प्रसंगी अग्रणी प्रबंधक चेतन शिरभाते, बँक ऑफ इंडिया आंचलिक कार्यालयाचे वित्तीय समावेशन विभागाचे पांडुरंग इंगळे तसेच मूल्यांकन अधिकारी अनिल काळे, अविनाश शेंडे, आरसेटीचे संचालक उदय राऊत उपस्थित होते.

या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना मोटर रिवाइंडिंग संबंधी संपूर्ण ज्ञान देऊन व प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून त्यांचे कौशल्य विकसित करण्यात आले. सोबतच एमआईडीसी येथील रिवाइंडिंग वर्कशॉपला प्रकल्प भेट देण्यात आली. प्रशिक्षणामधून विद्यार्थ्यांना या व्यवसायातील बारकावे समजून घेण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांनी आता आम्ही स्वतःचा व्यवसाय या क्षेत्रामध्ये सुरु करणार असल्याची ग्वाही दिली.

मूल्यांकन अधिकारी अनिल काळे व अविनाश शेंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच अग्रणी जिल्हा प्रबंधक चेतन शिरभाते यांनी प्रशिक्षणानंतर तुम्ही व्यवसाय करण्यास सज्ज झाला असून व्यवसायात येणाऱ्या छोट्या मोठ्या अडचणींमुळे डगमगून न जाता यशस्वी व्यवसायाकडे वाटचाल करावी. असे सांगितले.

व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची योग्य वेळेत परतफेड करावी जेणेकरून इतर शासकीय कर्ज योजनांमध्ये त्याचा फायदा होऊन व्यवसायामध्ये वाढ करता येईल. संस्थेचे संचालक उदय राऊत यांनी प्रशिक्षणामध्ये शिकवलेल्या व्यवसाय व्यवस्थापन कौशल्याचा उपयोग तुमच्या व्यवसायात करून आयुष्यामध्ये यशस्वी वाटचाल करावी. पुढे काही अडचण आल्यास संस्थेकडून मार्गदर्शन करू, अशी ग्वाही दिली.

आरसेटी ही संस्था बँक ऑफ इंडिया व ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकारच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बेरोजगारांकरिता निरनिराळ्या विषयांवरील नि:शुल्क प्रशिक्षण आयोजित करत असते. कार्यक्रमाचे संचालन आरसेटीच्या प्रशिक्षिका योगिता खैरे यांनी केले.  





  Print






News - Wardha




Related Photos