महावितरणचा कनिष्ठ अभियंता, वरीष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर :
विज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी २५ हजारांची लाच मागून १० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी महावितरणच्या  काटोल ग्रामीण २ कार्यालयातील कनिष्ठ अभियंता आणि वरीष्ठ तंत्रज्ञावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदिप सुदामा शर्मा (३१) असे कनिष्ठ अभियंत्याचे तर रविंद्र रामचंद्र बुंधाळे (५९) असे वरीष्ठ तंत्रज्ञाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार तक्रारदाराची ढवलापूर हेटी ता. काटोल येथे शेती आहे. शेतामध्ये विजजोडणीसाठी ऑनलाईन अर्ज केला होता. यानंतर त्यांनी काटोल एमएसईबी कार्यालयात जावून कनिष्ठ अभियंता शर्मा यांची भेट घेतली. यावेळी तक्रादारास शर्मा यांनी ऑनलाईन  अर्ज चुकीचा भरला असल्याचे सांगितले. यानंतर शर्मा आणि बुधाळे हे शेतामध्ये पाहणी करण्यासाठी गेले असता शेतामध्ये तक्रारदाराने पाणी देण्याकरीता अवैधरित्या विजजोडणी घेतल्याचे दिसून आहे. यामुळे विजचोरीचा गुन्हा दाखल न करण्याकरीता शर्मा व बुधाळे यांनी २५ हजार रूपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. 
सापळा कारवाई दरम्यान प्रदिप सुदामा शर्मा व रविंद्र रामचंद्र बुंधाळे यांनी विजचोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी २५ हजारांची मागणी करून तडजोडीअंती १० हजारांची लाच स्वीकारली. यावरून दोन्ही आरोपींविरूध्द काल १४ मे रोजी काटोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   Print


News - Nagpur | Posted : 2019-05-15


Related Photos