बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत एसडीपीओ काळे यांची नंदुरबारला बदली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
१मे रोजी नक्षल्यांनी पोलिस जवानांचे वाहन भुसुरूंग स्फोटात उडवून दिले. या घटनेत १५ जवान शहीद झाले. या घटनेला उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे बोलल्या जात होते. त्यांच्यावर चहूबाजूंनी टिका होत होती. अखेर त्यांची नंदुरबार येथे जातपडताळणी विभागात बदली करण्यात आली आहे.
जांभुळखेडाच्या घटनेनंतर एसडीपीओ काळे यांच्यावर शहीद जवानांचे कुटूंबीय तसेच नागरीकांनीही टिका केली होती. यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. आता त्यांची बदली करण्यात आली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-14


Related Photos