अहेरीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोन युवक ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 प्रतिनिधी / अहेरी :
  दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना आज १३ मे रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास अहेरी येथील प्राणहिता पोलिस मुख्यालयाजवळ घडली.
गोपाल रघुनाथ महतो रा. अहेरी आणि संतोष गट्टू दुडलवार रा. जिमलगट्टा अशी मृतकांची नावे आहेत. या घटनेत आणखी काही जण जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. प्राप्त माहितीनुसार आलापल्ली - अहेरी मार्गावरील प्राणहिता पोलिस मुख्यालयानजीक गोपाल आणि संतोष यांच्या दुचाकी वाहनांची जबर धडक बसली. मृतक गोपाल महतो हा अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात कार्यरत होता.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-13


Related Photos