महत्वाच्या बातम्या

  रेपनपल्ली येथे कृषी व जनजागरण मेळावा संपन्न


- शेतकऱ्यांचे समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध : माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम

- राजेंच्या हस्ते गोरगरीब शेतकऱ्यांना कृषिचे विविध साहित्य, गरजू महिलांना शिलाई मशीन व शाळाकरी विध्यार्थ्यांना सायकल वाटप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुक प्रतिनिधी / अहेरी : अहेरी विधानसभा क्षेत्रात गोरगरीब शेतकऱ्यांचे अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी रेपनपल्ली येथील कृषी मेळाव्यात बोलत होते.

यावेळी युवानेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, भाजपचे अहेरी तालुका अध्यक्ष रवि नेलकुद्री, भ्रष्टाचार निवारण समिती जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार ठाणेदार गोविंद कटिंग, पोलीस निरीक्षक रवी मनोहर, रेपनपल्ली चे सरपंच लक्ष्मी मडावी, कमलापूरचे उपसरपंच सचिन ओलेटीवार, प्रशांत नामनवार, विनोद जिल्लेवार, ग्रा.पं. सदस्य रजनीता मडावी तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.  

राजे पुढे बोलतांना म्हणाले कि, मागील ५ वर्षात अहेरी विधानसभेसाठीच नव्हे तर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी मोठी निधी खेचून आणली होती. त्यातले अनेक कामे आजही सुरू आहेत. केवळ निवडणुका लागले की, मोठमोठे आश्वासन देने आणि नंतर जनतेला वाऱ्यावर सोडणे हे माझ्याकडून कधीच झाले नाही. आज आमदार नसतांनाही जनतेच्या संपर्कात राहून विविध समस्या सोडविण्याचे काम सुरू आहे. आरोग्य शिक्षण या सोबतच कुठलेही समस्या असल्यास मला थेट संपर्क साधा करा, असेही त्यांनी यावेळी आवाहन केले. तर पोलीस अधिकाऱ्यांनीही उपस्थित जनतेला मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी राजेंच्या हस्ते उपपोलिस स्टेशन रेपनपल्ली अंतर्गत समाविष्ट गावातील गोरगरीब शेतकऱ्यांना विविध साहित्य वाटप करण्यात आले. त्यात शेतीचे उपकरणे, औषधी फवारणीचे स्प्रे पंप, पावडे, घमेले, खतांचे बॅग, गरजू महिलांना शिलाई मशीन तर शाळेकरी विध्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. या भव्य कृषी व जनजागरण मेळाव्याला शेकडो नागरिक उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos