किरकोळ महागाईचा दर २.९२ टक्के, खाद्यपदार्थ महाग झाल्याचा परिणाम


वृत्तसंस्था / नवीदिल्ली : केंद्रीय सांख्यिकी खात्याने किरकोळ महागाईची माहिती जाहीर केली असून  एप्रिल महिन्यात खाद्यपदार्थ महाग झाल्याने किरकोळ महागाईचा दर २.९२ टक्के इतका वाढला आहे. मार्चमध्ये हा दर २. ८६ टक्के होता.    सांख्यिकी खात्याने दिलेल्या माहितीनुसार खाद्यपदार्थांवरचा महागाई दर एप्रिल महिन्यात १.१ टक्के इतका होता. तर मार्च महिन्यात हा दर ०.३ टक्के होता.  
लोकसभा निवडणुका झाल्यानंतर महागाई वाढेल असाही अंदाज वर्तवला जातो आहे. तसेच याचा सर्वाधिक परिणाम हा खाद्यपदार्थांवर होणार आहे अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. वाढत्या अन्नधान्याच्या किंमतीमुळे किरकोळ महागाई दराने फेब्रुवारी महिन्यातही उचल खाल्ली होती. फेब्रुवारी महिन्यात हा दर २.५७ टक्के होता. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात अन्नधान्याच्या किंमती वाढल्या. यापूर्वी नोव्हेंबर २०१८ मध्ये हाच दर २.३३ टक्के होता. आता समोर आलेल्या आकडेवारीनुसार हा दर २.९२ टक्के इतका आहे. या खाद्यपदार्थांमध्ये भाजीपाला, अन्नधान्ये आणि इतर उत्पादनांचा समावेश आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर महागाई वाढण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.  Print


News - World | Posted : 2019-05-13


Related Photos