महत्वाच्या बातम्या

 महाराजा ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात : १ ठार


- पेपर मिल येथील कामगार उभ्या टँकरला दिली धडक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : पालगाव- राजुरा- बल्लारपूर चंद्रपूर मार्गे नागपूरला जाणाऱ्या महाराजा ट्रॅव्हल्सच्या खाजगी बस क्रमांक एम एच ३४ बी झेड ०००९ ला वर्धा जिल्ह्यातील जाम जवळील कांधाली जवळ भीषण अपघात झाला असुन त्यात एक जण ठार झाला. असून चालक वाहकासह ५ ते ६ प्रवासी गंभीर जखमी झाले.

माहितीनुसार मृतकाचे नाव धीरज कुळकर्णी (४८) वर्ष न्यू कॉलनी पेपर मिलचा रहिवासी असून ते बिल्ट मध्ये कार्यरत होते. गंभीर जखमी अवस्थेतील चालक, वाहक व प्रवाशांना नागपुर येथील रुग्णालयात दाखल करण्यात येत असुन किरकोळ जखमी प्रवाशांना स्थानिक रुग्णालयात प्राथमिक तपासणी व उपचारासाठी हलविण्यात आले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos