अचानक लागलेल्या आगीत ऑइल प्लांटचे लाखोंचे नुकसान


- सी.आर.पी.एफ. १९१ बटालियन च्या मदतीने टळली मोठी हानी 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज  :
शहरातील बाजार लाईन मधील गणपती ट्रेडर्स नामक दुकानाला रविवारी सकाळच्या सुमारास ४ वाजता अचानक आग लागली व आगीत दुकानातील सामग्री जाळून खाक झाली. यामुळे दुकान मलिक रवी मोटवाणी यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
प्राप्त माहितीनुसार , शहरातील मुख्य बाजारात गणपती ट्रेडर्स नामक दुकान आहे. रविवारी सकाळी सकाळी ४ च्या सुमारास अचानक दुकानाला आग लागली. आग लागल्याची बातमी मिळताच लोकांनी धावाधाव करत आग विझविण्याचा प्रयत्न केला.परंतु वेळेवर अग्निशमन दलाची गाडी पोहोचू शकली नाही म्हणून तात्काळ देसाईगंज येथील सी.आर.पी.एफ. १९१ व्या बटालियन ला पाचारण करण्यात आले . यात सी.आर.पी.एफ. च्या जवानांनी मुख्य भूमिका निभवत तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविले व गोडावून मध्येच ठेवून असलेल्या खाद्य तेलापर्यंत आग पोहोचण्यापूर्वीच जवानांनी आग आटोक्यात आणली . जवानांच्या या बचावकार्यामुळे मोठी हानी टळली. सदर आग   शॉर्ट सर्किट मुळे अथवा मिसफायर मूळे लागली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पुढील तपास देसाईगंज पोलीस करीत असून आग आटोक्यात आणण्याचे  श्रेय हे मुख्यतः सी.आर.पी.एफ. च्या १९१ बटालियन ला देण्यात येत आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-13


Related Photos