एटापल्ली तालुक्यात नक्षल्यांकडून पुन्हा वाहनांची जाळपोळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यात नक्षल्यांकडून रस्ता कामावरील वाहनांना लक्ष्य केले जात असून एटापल्ली तालुक्यातील बुर्गी परिसरात पुन्हा ३ वाहनांची जाळपोळ केल्याची घटना रविवारच्या रात्री घडली आहे.
एटापल्ली तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या बुर्गी परिसरात एका रस्त्याचे काम सुरू आहे. या कामावरील मिक्सर मशिन, टॅंकर आणि रोडरोलर नक्षल्यांनी जाळून टाकल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ही वाहने एटापल्ली नगर  पंचायतीचे उपाध्यक्ष रमेश गंपावार यांच्या   मालकीची असल्याचे कळते. ३० एप्रिल रोजी दादापूर येथे नक्षल्यांनी मोठ्या प्रमाणात वाहने पेटवून दिली होती. या घटनेच्या दुसर्याच दिवशी नक्षल्यांनी १ मे रोजी भुसुरूंग स्फोट घडवून १५  जवानांचा बळी घेतला होता. यानंतर भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात दोन इसमांचा नक्षल्यांनी खून केला. तसेच रस्ता कामावरील 3 वाहने जाळली होती. या घटना ताज्या असतानाच पुन्हा एकदा नक्षल्यांनी वाहने जाळून विकासकामांना विरोध दर्शविला आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-13


Related Photos