२० हजारात दुचाकी व दोन लाखात चारचाकी देणारी महिला कोट्यवधींची रक्कम घेऊन पसार


- देसाईगंज शहरात खळबळ , गुंतवणूकदार संतप्त 
 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज
: १० हजारात एक तोळा सोना, २० हजारात नविन दुचाकी तर दोन लाखात चारचाकी वाहन देण्याच्या थाप मारून लोकांना कोट्यवधी रुपयांनी फसविणारी महिला काल ११ मे रोजी  दुपार पासून घरातील सर्व सामान घेउन पसार झाली आहे. विविध आमिषांना बळी पडणाऱ्या नागरीकाना मात्र कोट्यवधींचा गंडा घातला गेल्यामुळे नागरिकांत विविध चर्चेला उत आला आहे. 
 शहरातील राजेन्द्र वार्डात आपल्या पती व मुला सोबत शिफा नावाची महिला मागिल ५ ते ६ वर्षापासून ब्यूटी पार्लर चालवित आहे. ब्यूटी पार्लरच्या माध्यमातून महिलांना  फक्त ३ हजारात शिलाई मशिन देण्याचे काम  शिफा नावाच्या महिलेने सुरू  केले. ४  वर्ष फक्त शिलाई मशिन देता - देता मागिल २ वर्षापासून ईतर मोठे साहित्य कमी रक्कमेत देणे सुरू केले होते. केवळ १५ हजारात घरगुती बोरवेल ,  ३  हजारात १० हजाराचा मोबाईल, १० हजारात एक तोळा सोना, २०  हजारात नविन दुचाकी तर दोन लाखात चारचाकी वाहन देणे सुरू केले. यामुळे सपूर्ण परीसरातील महिलांनी अमिषांना बळी पडून रक्कम गुंतवणे सुरू केले. 
 व्यवहार करताना शिफा फक्त महिलांसोबतच वार्तालाप करीत होती. एकढेच नाहीतर रक्कम परत मागितल्यास रक्कम परतही करीत होती. ती महिलांकडून फक्त आधार कार्डची झेराॅक्स घ्यायची. दिलेल्या रक्कमेचा कोणत्याही प्रकारचा प्रमाण मात्र राहत नव्हता हे विशेष. मात्र ही महिला पसार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी रक्कम गुंतवणूक करणाऱ्यांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. रक्कम तर मिळू शकत नाही तर एखादी वस्तू मिळावी यासाठी महिलांनी शिफा राहत असलेल्या घरी एकच गर्दी चालविली आहे. मात्र अद्याप कोणत्याही नागरिकांनी पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही, हे विशेष. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-12


Related Photos