चार दारूविक्रेत्यांना अटक, ११ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी धाड टाकून चार दारूविक्रेत्यांना जेरबंद केले आहे. या आरोपींकडून ११ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चंद्रपूर - नागपूर मार्गावर नाकाबंदी लावून वाहनाची तपासणी करीत असताना एमएच ४० एबी ६७३९ क्रमांकाच्या ह्युंदाई वरना कारमधून दारू जप्त करण्यात आली. या कारवाईमध्ये ६ लाख ८६ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस अटक करण्यात आली.
फुकटनगर येथे एका घरी अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून दोन इसमांना ताब्यात घेतले. या ठिकाणी १ हजार निपा देशी दारू, ४६ हजार ४०० रूपये रोकड व एक मोबाईल असा एकूण १ लाख ४७ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतच फाॅरेस्ट कार्यालयासमोरील मार्गावर नाकाबंदी दरम्यान एका सँट्रो  चारचाकी वाहनाची तपासणी केली  असता ८०० निपा देशी दारू आढळून आली. या कारवाईत २ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक महेशर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी पोलिस निरीक्षक ओ.जी.कोकाटे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक जावेद शेख, सहाय्यक फौजदार पंडीत वऱ्हाटे , दौलत चालखुरे, पद्माकर भोयर, पोलिस हवालदार महेंद्र भुजाडे, पोलिसव शिपाई जमिर खान, अनुप डांगे, मिलींद , चंदु नागरे, कुंदन बावरी, प्रफुल मेश्राम, प्रांजल झिल्पे, जादेव सिद्दीकी, अमोल धंदरे, रविंद्र बोरकर, मनोज रामटेके, रविंद्र पंधरे यांनी केली आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-05-11


Related Photos