वैशाली बांबोळे (गेडाम) युथ वर्ल्ड इंडियन आयकॉन अवार्ड ने सन्मानित


- सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने राजस्थान मध्ये  सत्कार 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  स्थानिक पोलीस ठाण्यातील महिला समुपदेशक  केंद्रातील  समुपदेशिका वैशाली बांबोळे यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने युथ वर्ल्ड शोशल मिडीया समूह बिकानेरच्या वर्ल्ड शोशल मिडिया मैत्री संमेलन आणि युथ वर्ल्ड इंडियन आयकॉन अवार्डने नुकतेच राजस्थानच्या जयपूर मध्ये सन्मानित करण्यात आले.
 गडचिरोली येथील पोलीस स्टेशन मधील महिला समुपदेशक केंद्रात समुपदेशिका पदावर कार्यरत असलेल्या वैशाली बांबोळे यांनी  गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण व शहरी भागतील महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडली आहे. तसेच घरगुती वादाचे अनेक प्रकरण योग्य प्रमाणे निकाली काढले.   अनेक  पिडीत महिलांना न्याय मिळवून देण्याचे निरंतर कार्य केले.  याची दखल घेत राजस्थान मधील बिकानेरच्या युथ वर्ल्ड शोशल मिडीया समूहाने वैशाली यांचा सत्कार करून युथ वर्ल्ड इंडियन आयकॉन अवार्ड ने सन्मानित सन्मानित केले. त्यांच्या या यशाबद्दल गडचिरोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार दिपरत्न गायकवाड , पोलीस उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील, पोलीस उपनिरीक्षक तांबूसकर , पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम, महिला व बाल कल्याण अधिकारी भडांगे, महिला व बाल कल्याण विभागाचे संरक्षण अधिकारी  महाकर, अमोल किरमीजवार, संघपाल गेडाम ,गजेंद्र डोमळे, आई-बाबा,बहिण-भाऊजी यांनी अभिनंदन केले.  तसेच त्यांच्या यशाबद्दल जिल्ह्यात सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-11


Related Photos