बैलगाडीने रेती वाहतूक करीत असल्याची माहिती देतो म्हणून मारहाण करणाऱ्या चार आरोपींना कारावास


- प्रत्येकी १ हजारांचा दंडही ठोठावला
- गडचिरोली न्यायालयाचा निकाल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
बैलबंडीने रेती डूलाई करीत असल्याची माहिती तलाठी व तहसीलदारांना देतो अशा संशयावरून भांडण करून मारहाण करणाऱ्या चार आरोपींना गडचिरोली येथील प्रथम श्रेणी न्यायाधिश एच.पी. पंचोली यांनी प्रत्येकी २ महिन्यांचा कारावास व १ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
नामदेव कवडू बारसागडे, विनोद तुळशिराम बारसागडे, सुभाष शामराव नैताम व देविदास हरीदास भांडेकर रा. हनुमान वार्ड गडचिरोली अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार फिर्यादी आकाश किशोर सहारे याला चारही आरोपींनी मारहाण केली होती. याबाबत ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी गडचिरोली पोलिस ठाण्यात कलम ३४१ , ३२३ , ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार शशीकर चिचघरे यांनी पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 
काल १० मे रोजी आरोपींविरूध्द सबळ पुरावे असल्याने न्यायाधिश एच.पी. पंचोली यांनी चारही आरोपींना कलम ३२३ भादंवि अन्वये प्रत्येकी २ महिने साधा कारावास व प्रत्येकी १ हजार रूपये द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास १५ दिवस साध्या कारावाची शिक्षा देण्याचा आदेश देण्यात आला आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अमर फुलझेले यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार यशवंत मलगाम, कोर्ट मोहरर पोलिस नाईक सुभाष सोरते यांनी काम पाहिले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-11


Related Photos