आज अवकाळी पावसाची शक्यता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
 गुरुवारपासून   विदर्भातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये ढगांची वर्दी लागली आणि तापमान किंचित कमी झाले.  शुक्रवारी उष्णतेची लाट कायम राहिली असली तरी शनिवारी विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 
गुरुवारी ब्रह्मपुरी येथे विदर्भातील सर्वाधिक ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. परंतु, १० मेपासून विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पावसाचासुद्धा इशारा देण्यात आला . त्यामुळे या आठवड्यात ऊन-पावसाचा खेळ रंगण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. फनी हे वादळ अधिक तीव्र झाल्याने त्याचा देशातील इतर भागांवरसुद्धा परिणाम झाला. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमधील उष्णतेची लाट मंदावली होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून तापमानात परत एकदा वाढ झाली. गुरुवारी चंद्रपूर येथे ४५.४, गडचिरोली आणि नागपूर येथे प्रत्येकी ४४.६ आणि अकोला, अमरावती येथे प्रत्येकी ४३ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. गुरुवारी विदर्भात गडचिरोली व्यतिरिक्त सगळ्याच जिल्ह्यांमधील तापमानात घसरण झाली. शुक्रवारीसुद्धा विदर्भात ढगाळ वातावरण होते. केवळ चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथे तापमान ४५ अंशांच्या आसपास राहील. मात्र शनिवारी आणि रविवारी विदर्भात अकोला वगळता सगळ्याच  जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.   Print


News - Nagpur | Posted : 2019-05-11


Related Photos