माजी आमदार सुभाष धोटे यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / राजुरा :
अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीवर अत्याचाराच्या प्रकरणानंतर वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले माजी आमदार सुभाष धोटे यांचा अटकपूर्व जामीन  जिल्हा सत्र न्यायालयाने  फेटाळला आहे. 
येथील नामांकित दर्जा प्राप्त वसतिगृहात अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीवर अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यात एकच खळबळ माजली. या प्रकरणात संस्थाध्यक्ष सुभाष धोटे, काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे लोकसभा उमेदवार बाळू धानोरकर हे, पैसे मिळतात म्हणून आदिवासी मुली तक्रारी दाखल करीत आहे. असे वादग्रस्त विधान केले. त्यांचे विधानाने संतप्त झालेले आदिवासी कार्यकर्ते कमलेश आत्राम यांनी रामनगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती . या तक्रारी वरून रामनगर पोलिसांनी सुभाष धोटे व इतर यांचे विरोधात अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला. सुभाष धोटे यांनी आज अटकपूर्व जामिनासाठी  जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र  जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्याने सुभाष धोटे यांना धक्का बसला आहे.  तक्रारकर्ते कमलेश आत्राम आज कोर्टात हजर होते.  कोर्टाने त्यांचेही म्हणणे ऐकून घेतले. सुभाष धोटे यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या  नागपूर खंडपिठातही अर्ज दाखल केला होता. तेथेही त्याना दिलासा मिळाला नव्हता हे विशेष.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-05-10


Related Photos