देसाईगंज येथील तिरुपती राईस इंडस्ट्रीज मधील कुकसाच्या हाॅपरमध्ये मजुराचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
तिरुपती राईस मिल लगतच अससलेल्या कविता कैलास अग्रवाल यांच्या नावाने असलेल्या तिरुपती राईस इंडस्ट्रीज मधील कुकसाच्या हाॅपरमध्ये भरडुन मजुराचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. 
 विनोद गणपत मेश्राम (३१)  रा.हरदोली असे मृतकाचे नाव असुन तो तिरुपती राईस इंडस्ट्रीजमध्ये मजुरीच्या कामावर होता. दरम्यान सदर राईस इंडस्ट्रीजच्या संचालकाने आज दुपारी कुकसाच्या हाॅपरमध्ये उतरुन सफाई करण्यास सांगितले असता हाॅपरच्या उष्णतेने त्याचा भरडुन मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रेत ताब्यात घेतले असुन उत्तरीय तपासणीसाठी  देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटना ही मालकाच्या दबावतंञामुळे घडली असल्याचे सांगण्यात येत असल्याने  संबंधित मालकावर सदोष मणुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृतकाच्या कुटुंबियांना नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. पुढील तपास देसाईगंज पोलिस करीत आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-10


Related Photos