महत्वाच्या बातम्या

 चांद्रयान-३ बाबत मोठी अपडेट : प्रोपल्शन मॉड्युलपासून लँडर वेगळे झाले, आता चंद्र फक्त १०० पावले दूर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : हिंदुस्थानच्या चांद्रयान-३ या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. चांद्रयान-३ च्या प्रोपल्शन मॉड्युलपासून विक्रम लँडर वेगळे करण्यात ISRO ला यश आले आहे. आता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा अखेरचा १०० किलोमीटरचा प्रवास विक्रम लँडरला एकट्याने करावा लागणार असून २३ ऑगस्ट रोजी त्याचे चंद्रावर लँडिंग होण्याची शक्यता आहे.

बुधवारी चांद्रयान-३ ने आपली कक्षा बदलली होती. त्यामुळे इस्त्रोसाठी आज दिवस महत्त्वाचा होता. आज प्रोपल्शन मॉड्युलपासून विक्रम लँडर वेगळे करण्याचे आव्हान इस्त्रीपुढे होते. हे आव्हान यशस्वीरित्या पेलत इस्रोने विक्रम लँडर वेगळे करण्यात यश मिळवले आहे.

आता विक्रम लँडरला चंद्राच्या पृष्टभागावर उतरण्यासाठी १०० किलोमीटरचा प्रवास एकट्याने करावा लागेल. यासाठी लँडरला इंजिन अर्थात थ्रस्टर्सचा वापर करून आपला वेग नियंत्रित करावा लागेल. यासह पृष्ठभागापासूनची उंचीही हळूहळू कमी करत जावे लागेल.

दरम्यान, प्रोपल्शन मॉड्युलपासून वेगळे झाल्यानंतर विक्रम लँडर आता गोलाकार ऑर्बिटमध्ये फिरणार नाही. आता ३० km x १०० km च्या अंडाकृती ऑर्बिटमध्ये फिरण्यासाठी लँडरला दोन वेळा डीऑर्बिटिंग करावे लागेल. याचा अर्थ पृष्ठभागापासूनची उंची कमी करावी लागेल आणि हळूहळू वेगही कमी करावा लागेल. यासाठी इंजिनांचा वापर केला जाईल. लँडर इंजिनांचे रेट्रोफियरिंग करेल. अर्थात इंजिन विरुद्ध दिशेला फिरवले जाईल.





  Print






News - World




Related Photos