गडचिरोली नगरपालिकेचे निकृष्ट काम , रस्त्यावर टाकलेली पायली एका दिवसातच फुटली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी/ गडचिरोली :
स्थानिक नगर परिषदेच्या वतीने निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याचे दिसून येत आहे.  स्थानिक  सद्गुरूनगर येथील रस्त्यावर  अनेक दिवसांपूर्वी  पाणी वाहून जाण्यासाठी टाकलेली पायली फुटली होती. यामुळे  परिसरातील नागरिकांना येण्या -  जाण्यास त्रास होत होता. वारंवार तक्रार केल्या नंतर नगर पालिकेने तेथे नवीन पायली टाकली . परंतु एका दिवसातच ती पायली फुटल्याने नगरपालिकेचा बोगस कारभार चव्हाट्यावर आला आहे. 
नगर परिषदेच्या कामात पारदर्शकता पाळण्याच्या मुद्यावर निवडून आलेले पदाधिकारी नगरपरिषदेच्या  कारभाराकडे लक्ष देत नसल्याने शहरात निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याचा आरोप केला जात आहे.    या रस्त्यावरून जड वाहतूक नसतांना सुध्दा पायली एका दिवसातच फुटली. यावरून नगरपालिकेेने काम किती गांभीर्याने केले हे दिसून येते.  यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नगरपालिकेषियी रोष निर्माण झाला आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-10


Related Photos