महत्वाच्या बातम्या

 आता मणिपूरमध्ये प्रत्येक गुन्ह्याचा हिशेब होणार : सीबीआय ने तपासासाठी उतरवले २९ महिला अधिकाऱ्यांसह ५३ अधिकारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मणिपुर : मणिपुरमध्ये सीबीआय चौकशीच्या घेऱ्यात आलेल्या सुरुवातीच्या ११ प्रकरणांच्या तपासासाठी डीआयजी स्तरावरील तीन अधिकाऱ्यासंह ५३ अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यात दोन महिला डीआयजी रँकच्या अधिकाऱ्यांसह २९ महिला अधिकारी/कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार आणि महिलांवर झालेल्या अमानवीय अत्याचारांसंदर्भात ६५०० हून अधिक एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. यांपैकी ११ घटना अति संवेदनशील आहेत. यांच्या तपासाची जबाबदारी सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. केंद्र आणि मणिपूर सरकारने ही प्रकरणे मणिपूर पोलिसांकडून काढून सीबीआयला सोपवण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली होती.

पंतप्रधानांनी आपल्या भाषणातही केला होता उल्लेख : 

स्वतंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वज फडकावल्यानंतर, देशाला संबोधित करताना, गेल्या काही आठवड्यांत इशान्य भारतात विशेषतः मणिपूरमध्ये जो हिंसाचार झाला. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. आई-बहिणींच्या सन्मानासोबत जो प्रकार घडला. मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शांततेच्या बातम्या येत आहे. देश मणिपूरच्या नागरिकांसोबत आहे. मणीपूरने गेल्या काही दिवसांत जी शांतता राखली आहे. तशीच राखावी, कारण यातूनच समाधानाचा मार्ग निघेल. यासाठी सरकारही योग्य ते प्रयत्न करत आहे आणि करत राहील.

मणिपूर वादाची कारणे काय? -

- कुकी समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा आहे. आता मैतेई लोकही अनुसूचित जमातीचा दर्जा मागत आहेत.

- नागा आणि कुकी समुदायाचे म्हणणे आहे की, सर्व विकासाचा फायदा मूल निवासी मैतेईच घेतात. अधिकांश कुकी म्यानमारमधून आले आहेत.

- मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील या परिस्थितिसाठी म्यानमारमधून होणारी घुसखोरी आणि अवैध शस्त्रे जबाबदार असल्याचे म्हटले आहे. कुकी समुदायाला जवळपास २०० वर्ष राज्याचे संरक्षण मिळाले आहे. अनेक इतिहासकारांच्यामते इंग्रजांनी कुकी लोकांना नागांविरुद्ध आणले आहे.

- जेव्हा नाग लोक इंग्रजांवर हल्ले करत होते, तेव्हा हेच कुकी लोक इंग्रजांचा बचाव करत होते. यानंतर बहुतेकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, यामुळे त्यांना अधिक फायदा मिळाला आणि एसटीचा दर्जाही मिळाला.





  Print






News - Rajy




Related Photos