नागपुरात २४ तासात उष्माघाताने तिघांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
 नागपूर शहरात  गेल्या २४ तासात ३ पोलीसठाण्यांतर्गत घडलेल्या ३ वेगवेगळ्या घटनेत तिघांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
  वाडी पोलीसठाण्यातंर्गत वडधामना वाडी देशमुख ले-आउट पितांबरी प्रॉडक्ट प्रा. लि. कंपनीजवळ सांड पाण्याच्या थळीवर सुभाष रामभाउ गणविर (४०) हा  ८ मे रोजी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास बेशुध्दावस्थेत सापडला. त्याला उपचाराकरीता मेयो हॉस्पीटल येथे नेले असता डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले.  तो राव ले-आउट लक्ष्मीनगरच्या वॉर्ड क्रमांक २, वडधामना, नागपूर येथील रहिवासी आहे.  वाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दुसऱ्या घटनेत एमआयडीसी अंतर्गत इसासनी माधवनगर, हिंगणा रोड, एमआयडीसी नागपूर येथील रहिवासी प्रविण प्रमोद साठवणे (३७) हा ८ मे रोजी सायंकाळी ६.२५ वाजताच्या दरम्यान प्रतापनगर हद्यीतील अरीहंत एटरप्रायजेस दुकानात गिफ्ट घेण्याकरीता गेला होता. त्याला अचानक भोवळ आली आणि तो खाली पडला. त्याला उपचाराकरीता पडोळे हॉस्पीटल येथे नेले असता डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले. याप्रकरणी  प्रतापनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
तिसऱ्या घटनेत बेलतरोडी हद्दीतील श्रृतीकिर्ती अपार्टमेंन्ट, न्यु लुक कॉन्हवेन्टसमोर, नागपूर येथील रहिवासी सतिश किसनराव गेडाम (४५) हे ९ मे रोजी मध्यरात्री दीडच्या पुर्वी भारत पेट्रोलपंपाजवळ मृतावस्थेत आढळले. याप्रकरणी  बेलतरोडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2019-05-10


Related Photos