महत्वाच्या बातम्या

 पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करा : कोरची तालुका व्हॉइस ऑफ मिडिया


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्या हल्लेखोरावर कडक कारवाई करावी यासाठी कोरची तालुका व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करत कोरची तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्र्यांना १४ ऑगस्ट रोजी निवेदन पाठवण्यात आले.

निवेदनात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील वृत्तवाहिनीचे धडाडीचे पत्रकार संदीप महाजन यांच्यावर आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो. लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जाणारा पत्रकारितेवर हा हल्ला म्हणजे पत्रकारितेचे मुस्कटदाबी आहे. आमदार किशोर पाटील आणि त्यांच्या हल्लेखोर समर्थकावर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करावी अशी आम्ही मागणी करीत आहोत.

पाचोरा येथील एका घटनेच्या संदर्भात संदीप महाजन यांनी बातमी दिली होती. त्याचा राग धरून किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना चार दिवसापूर्वी फोन करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती ही क्लिप वायरल झाल्यावर आमदारांनी साडसूदपणे शिवीगाडीचे समर्थन देखील केले होते. या घटनेची संतप्त प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकारितेच्या जगात उमटली होती मात्र तेव्हा संदीप महाजन यांनी समन्वयाची, सामंजस्याची भूमिका घेतली तरीही आमदारांची खुमखुमी थांबत नव्हती. संदीप महाजन रेल्वे आंदोलनाची बातमी कव्हर करून घरी परत येत असताना चार पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. 

नगरपालिके समोर ज्या चौकात हल्ला झाला तो चौक महाजन यांचे स्वातंत्र्यसैनिक वडिलांच्या नावाने ओळखला जातो. येथेच त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली गेली महाजन त्यात गंभीर जखमी झाले आहेत. संदीप महाजन यांनी पोलिसात तक्रार दिली असून किशोर पाटलांनीच आपल्यावर गुंडाकडून हल्ला केल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे सत्य बातमी देणाऱ्या पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या घटना महाराष्ट्रात सातत्याने घडत आहेत माध्यमांच्या प्रतिनिधींना काम करणे अशक्य झाले असून राज्यात माध्यम स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार किशोर पाटील व त्यांच्या हल्लेखोर समर्थकावर कठोर कारवाई करतील असे निवेदनात म्हटले आहे.

कोरची तहसीलदार प्रशांत गड्डम यांना निवेदन देताना कोरची तालुका वाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष लिकेश अंबादे, जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर वैरागडे, तालुका उपाध्यक्ष लालचंद जनबंधू, कार्याध्यक्ष शालिकराम कराडे, सरचिटणीस मधुकर नखाते, खजिनदार सुरज हेमके, संघटक राष्ट्रपाल नखाते, कार्यवाहक अरुण नायक, सदस्य राकेश मोहुर्ले, श्यामकुमार यादव उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos