महत्वाच्या बातम्या

 अमलनाला धरणात युवकाचा बुडून मृत्यू : स्वांतंत्रदिनाच्या दिवसीची घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : १५ ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. यादिवशी अनेक नागरिक फिरायला बाहेर पडतात मात्र फिरण्याची ही हौस एका युवकाच्या जीवावर बेतली.

जिल्ह्यातील अनेक भागात पाण्याचे धबधबे पाहण्यास काल असंख्य नागरिकांनी गर्दी केली होती, अश्यातच गडचांदूर येथील अमलनाला डॅम येथे वेस्ट वेअर जवळ नागरिकांनी गर्दी केली.

माहितीनुसार चंद्रपुर शहराजवळील दाताला येथील काही युवक अमलनाला धरणाजवळ फिरण्यासाठी आले होते. दुपारी २ वाजताच्या सुमारास ३२ वर्षीय शुभम शंकर चिंचोळकर या युवकाने डॅम च्या वेस्ट वेअर पाण्यात उडी मारली मात्र शुभम ला खोलाचा अंदाज आला नसल्याने तो पाण्यात बुडाला. शुभम बाहेर न आल्याने मित्रांनी मदतीची हाक मारली, पोलिसांना सूचना देण्यात आली असता तात्काळ गडचांदूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

काही वेळात पोलिसांनी शुभम चा मृतदेह बाहेर काढला, स्वातंत्र्य दिनी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आहे. पावसाळ्यात अमलनाला धरण पाण्याने भरल्यानंतर त्या ठिकाणातून वेस्ट वेअर परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात, मागील वर्षी याच ठीकाणी दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता. 

एपीआई प्रमोद शिंदे यांच्या पथकाने मृतदेह बाहेर काढला असून पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos