महत्वाच्या बातम्या

 शेत शिवारातील जमीन भूमिगत कोळसा खाणीसाठी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : तालुक्यातील नांदगाव पोडे हद्दीतील शेत शिवारातील जमीन खाजगी कंपनी ला भूमिगत कोळसा खान साठी शेतकऱ्यांचा विरोध दर्शविला आहे.

मागील एक वर्षापासून ग्रामपंचायत नांदगाव पोडे येथील शेतकरी एका खाजगी कंपनीच्या चालू होणाऱ्या भूमिगत कोळसा खाणींच्या चर्चेमुळे विवंचनेत आहे. शेतशिवार जमीन ही शेतकऱ्यांच्या स्वतःच्या हक्काची जमीन असून कुणाचीही हुकूमशाही शेतकरी सहन करून घेणार नाही. 

सनफ्लाग या खाजगी कंपनी द्वारे भिवकूंड भूमिगत कोळसा खान ८०२ हेक्टर मध्ये होणार असून काही शेतकऱ्यांच्या जमिनी दलाला मार्फत हस्तगत करण्याचे काम केल्या जात आहे. हा विषय गावाच्या हिताचा असून अतिशय संवेदनशील विषय झाला आहे. गावात अनुचित घटना घडू नये यासाठी ग्रामपंचायत ने त्वरित ग्रामसभा घेऊन शेतकऱ्यांचे हित जोपण्याची मागणी निवेदन द्वारे सरपंच ला केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos