भामरागडची अटल वाहिनी रूग्णवाहिका उलटली, जिवितहाणी नाही


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड 
: आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करता यावा याकरीता शासनाकडून प्राप्त झालेल्या अटल वाहिणी रूग्णवाहिकेला आज ९ मे रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास भामरागड - आलापल्ली मार्गावर अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहाणी झाली नाही.
एमएच १४ एचजी ०४७४ क्रमांकाची रूग्णवाहिका भामरागड येथून आलापल्लीकडे जात होती. दरम्यान भामरागडपासून ५ ते ६ किमी अंतरावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रूग्णवाहिका उलटली. यावेळी वाहनात डॉ. दिनेश मेश्राम आणि रूग्णवाहिका चालक छगण बांबोळे हे होते. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. 
भामरागड तालुक्यातील आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर उपचारासाठी सर्व सोयीसुविधायुक्त अटल वाहिणी रूग्णवाहिका काही दिवसांपूर्वीच प्राप्त झाली. या रूग्णवाहिकेचे आदिवासी विकास विभागाच्या  विभागीय आयुक्तांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-09


Related Photos