दोन हजारांची लाच स्वीकारताना तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा :
शेतजमिनीचे फेरफार करण्याकरीता दोन हजारांची लाच स्वीकारणारा तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडका आहे. राहुल सुधाकर बरवट, (३०) साझा क्र. ११, लहान आर्वी तह. हिंगणघाट जि. वर्धा असे लाचखोर तलाठ्याचे नाव असून वडनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
तक्रारदार  लहान आर्वी तह. हिंगणघाट   येथील रहिवासी असुन शेतीचे काम करतो. तक्रारदाराने एक महिण्यापूर्वी ५ एकर शेती मुलाचा नावाने विकत घेतली. सदर शेतीचे मुलाच्या नावाने फेरफार करण्याकरिता आवश्यक  कागदपत्रासह तलाठी कार्यालय, साझा क्र. ११, लहान आर्वी तह. हिंगणघाट जि. वर्धा येथे गेले असता तेथील कार्यरत तलाठी राहुल सुधाकर  याने  तक्रारदारास शेतीचे फेरफार   मुलाच्या  नावाने करण्याकरिता  २ हजार रूपये लाचेची मागणी केली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वर्धा येथे तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वर्धा तर्फे सापळा कार्यवाही आयोजीत केली असता सापळा कार्यवाही दरम्यान तलाठी राहुल सुधाकर बरवट याने तक्रारदारास शेतीचे फेरफार त्याच्या मुलाच्या नावाने करण्याकरिता दोन हजार रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्विकारली. यावरून आरोपी विरूध्द पोलीस ठाणे वडनेर तह. हिंगणघाट  येथे लाचलुचपत प्रतिबंध कायदा १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
सदर कार्यवाही  पोलिस उपायुक्त, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे  (अतिरिक्त कार्यभार) ,  अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार, यांच्या मार्गदर्शनात  पोलीस निरीक्षक  सुहास चौधरी, नापोशि रोशन निबोंळकर, अतुल वैद्य, प्रदीप कुचनकर, कैलास वालदे, चालक पोहवा राजेश साहु यांनी केली आहे.

   Print


News - Wardha | Posted : 2019-05-09


Related Photos