देसाईगंज पोलिस बेपत्ता मुलाच्या शोधात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : 
येथील विर्शी वार्डातील १० व्या वर्गात शिकत असलेला मुलगा २९ एप्रिल पासुन बेपत्ता असल्याची तक्रार सदर मुलाच्या आईने देसाईगंज पोलिस ठाण्यात दिली . देसाईगंज पोलिस बेपत्ता मुलाच्या शोधात असून कुणाला आढळून आल्यास देसाईगंज पोलिसांशी संपर्क साधण्याचे  आवाहन देसाईगंज पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पञकातुन केले आहे. 
 साहिल विलास दोनाडकर (१६) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव असुन तो २९  एप्रिल  रोजी आपल्या घरून रात्री अंदाजे ७:३०  च्या सुमारास शौचासला गेला.  तेव्हापासून तो घरी परत आला नाही. त्याच्या आजुबाजूला, नातेवाईकांकडे, मिञांकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आला नाही.  सदर मुलगा सावळ्या रंगाचा असुन मजबूत बांधा,अंगात निळा जिन्स पॅन्ट, काळ्या रंगाची टि-शर्ट, गोल चेहरा, काळे केस, तसेच दोन्ही कान टोचवले असुन तो मराठी भाषिक आहे. अशा वर्णनाचा मुलगा कुणास आढळून आल्यास त्यांनी त्वरीत देसाईगंज पोलिसांशी दूरध्वनी क्रमांक 07137-272027 तथा 9422821727 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देसाईगंज पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पञकातुन केले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-09


Related Photos