महत्वाच्या बातम्या

 कमळाचा आधार घेणारेही चिखलमय झाले, विजय वडेट्टीवार यांचा टीकास्त्र : गडचिरोली येथे जाहीर सत्कार


- विजय वडेट्टीवार यांचा जाहीर सत्कार करताना आ. सुधाकर अडबाले, डॉ. उसेंडी, अतुल मल्लेलवार, पंकज गुडेवार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : ज्यांचे पाय भ्रष्टाचाराच्या खोल चिखलात सापडले आहेत, अशांनी कमळाचा आधार घेत स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, कमळाचा आधार घेणारेसुद्धा पूर्णपणे चिखलमय होतील. २०२४ मध्ये देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. देशभरात महागाई प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. जुन्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे नाहीत. मात्र, केवळ मतांसाठी नवीन योजनांचा पाऊस पाडला जात आहे, अशी टीका राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने गडचिरोली येथे जाहीर नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते.

यावेळी शहरातील मुख्य मार्गानी विजयी रॅली काढण्यात आली. इंदिरा गांधी चौकात जाहीर सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमाला आ. सुधाकर अडबाले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव नामदेव किरसान, माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, उपस्थित होते.

युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, अॅड. राम मेश्राम, माजी खा. मारोतराव कोवासे, माजी आ. आनंदराव गेडाम, कृउबास सभापती अजय कंकडालवार, माजी नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, माजी आ. रामकृष्ण मडावी, कांग्रेस महिला जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, डॉ. नितीन कोडवते, राजेश कात्रटवार, अरविंद कानटवार, सतीश विधाते, अतुल मल्लेलवार, जेसा मोटवाणी, सुरेंद्रसिंह चंदेल, डॉ. हेमंत अप्पलवार, बंडोपंत मल्लेलवार, अतुल मल्लेलवार, कुणाल पेंदोरकर, शेखर आखाडे, पंकज गुडेवार आदी मान्यवर उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos