महत्वाच्या बातम्या

 जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःप्रती विश्वास व जिद्द आवश्यक : डॉ.शाम कोरेटी यांचे प्रतिपादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : १४ गोंडवाना विद्यापीठातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत नागरी सेवा परीक्षा प्रशिक्षणार्थी संवाद 

नागरी सेवा परीक्षेत इतिहास-ऐच्छिक विषयातील संभावना या विषयावर चर्चासत्र चे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून  अधिष्ठाता व इतिहास विभाग प्रमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर  डॉ.शाम कोरेटी, उपस्थित होते. या प्रसंगी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याकरिता आत्मविश्वास व आदर्श नियोजन महत्वाचे असुन याद्वारे यश संपादन करू शकतो, इतिहास विषयाचा अभ्यास करत असतानी काळनुरूप घटना लक्षात ठेवण्याकरीता नवीन पद्धतीने आकलन क्षमता तयार करणे गरजेचे आहे. विध्यार्थ्यानी उद्दीष्ट साध्य करत असताना दुरदृष्टीकोण ठेवणे आवश्यक असुन  पाठांतरवर भर देण्यापेक्षा नियोजन पद्धतीने संपूर्ण अभ्यास करणे महत्वाचे आहे. 

इतिहास विषयाचा अभ्यास करतांना विविध घटना कशा लक्षात ठेवायच्या या संबधी विविध तंत्राची माहिती दिली. इतिहास विषय निवड करताना आदर्श नियोजन टप्पे म्हणजे नामांकित इतिहासकाराचे संदर्भ पुस्तके याचा सखोल अभ्यासाबरोबर स्वतःची टिप्पणी तयार करणे महत्वाचे ठरते. विद्यार्थ्यानी जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःप्रती विश्वास व जिद्द आवश्यक आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.

विद्यार्थी संवाद मध्ये इतिहास विषय कसा उपयोगी होईल याविषयी विद्यार्थ्यां सोबत डॉ. शाम कोरेटी यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रम प्रसंगी प्राध्यापक वर्ग, नागरी सेवा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम विद्यार्थी, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा. प्राध्यापक इतिहास विभाग डॉ.नरेश मडावी, यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन सह-समन्वयक स्पर्धा परीक्षा केंद्र प्रा.सत्यनारायण सुदेवाड, व आभार समन्वयक डॉ.वैभव मसराम, स्पर्धा परीक्षा केंद्र यांनी मानले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos