महत्वाच्या बातम्या

 आरमोरी व देसाईगंज तालुक्यातील पोलीस पाटील पदभरतीसाठी जाहीरात-२०२३ बाबत सूचना


- गडचिरोली जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय देसाईगंज अंतर्गत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय देसाईगंज यांचे अंतर्गत (देसाईगंज व आरमोरी) एकूण २३ रिक्त पदे असून त्यामधील ९ पदे अनुसूचित क्षेत्रातील व १४ पदे बिगर अनुसूचित क्षेत्रातील आहेत. १० ऑगस्ट २०२३ रोजी काढलेल्या आरक्षणानुसार अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमाती याप्रवर्गाकरीता शिवणी खुर्द, देऊळगांव, भान्सी, वनखेडा, ठाणेगांव, चिचोली व अनुसूचित जमाती (महीला) याप्रवर्गाकरीता तुलतुली, लोहारा व चव्हेला ही गावे निश्चीत झालेली आहेत. 

त्याचप्रमाणे बिगर अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जाती या प्रवर्गाकरीता सावंगी, आकापुर चक, अनुसूचित जमाती प्रवर्गाकरीता सिर्सी, इ.मा.व प्रवर्गाकरीतादेविपुर कॅम्प, रावणवाडी, एकलपुर व अरसोडा, वि.जा. (अ) या प्रवर्गाकरीता नवरगांव, चोप, अराखीव (खुल्या) प्रवर्गाकरीता जुनी वडसा, वघाळा, भ.ज. (ड) या प्रवर्गाकरीता वडधा, भ.ज. (क) या प्रवर्गाकरीता किटाळी व आ.दु. घ.(आर्थीक दुर्बल घटकाकरीता) नैनपुर हे गांव निश्चीत झालेले आहेत. 

उक्त नमुद गावातील उचित अहर्ताधारक व्यक्तीकडून विहीत नमुन्यात अर्ज ऑफलाईन पध्दतीने १६ ऑगस्ट २०२३ ते २४ ऑगस्ट २०२३ पर्यंत उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय देसाईगंज येथे मागविण्यात येत आहे. 

पोलीस पाटील या पदाचे सरळसेवा भरती प्रक्रीयेचा सविस्तर जाहीरनामा ०१ ऑगस्ट २०२३ रोजी सर्व संबंधीत गावात, तलाठी कार्यालय, तहसिल कार्यालय, पोलीस स्टेशन येथे प्रसिध्द करण्यात येत आहे. 

तरी ईच्छुक स्थानीक उमेदवारांनी जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या पात्रतेचे निकष व विहीत अटी व शर्तीवर अर्ज उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, देसाईगंज येथे सादर करावा. असे जे.पी. लोंढे, अध्यक्ष, पोलीस पाटील पदभरती निवड समिती- २०२३ तथा उपविभागीय दंडाधिकारी, देसाईगंज यांनी कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos