दंतेवाडा येथील चकमकीत दोन नक्षल्यांचा खात्मा : शस्त्रसाठा जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था  / रायपूर :
छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे सुरक्षा दल आणि नक्षल्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत दोन नक्षल्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. जवानांनी नक्षल्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे. प्राप्त माहितीनुसार, छत्तीसगडमधील दंतेवाडात जिल्हा राखीव सैनिक (डीआरजी) व विशेष कृती दलाच्या जवानांनी गोंदरस जंगलात ही संयुक्त कारवाई केली आहे. अरनपूरजवळ असलेल्या गोंदरसच्या जंगलात ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईत पहिल्यांदाच महिला कमांडो सहभागी झाल्या होत्या. घटनास्थळावरून एक रायफल, १२ बंदुकांसह मोठ्या प्रमाणात दारू गोळा आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईनंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.  Print


News - World | Posted : 2019-05-08


Related Photos