लोकसभेच्या निकालाला होणार चार ते पाच तास उशीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
लोकसभा निवडणुकांचे अवघे तीन टप्पे राहिले असून निकालाची तारीख जवळ येऊ लागली आहे. २३  मे रोजी निकाल जाहीर होणार असून साऱ्यांनाच त्याचे वेध लागले आहेत. ईव्हीएम मशीन वापरात आल्यापासून निकाल लवकर लागतात. मात्र यंदा निकालास चार ते पाच उशीर लागण्याची शक्यता आहे.
एका वृत्तसंस्थेने निवडणूक आयुक्त सुदीप जैन यांच्या हवाल्याने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे. जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार निकालास यंदा उशीर होण्याची शक्यता आहे. ईव्हीएम च्या मतमोजणी सोबतच व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्यांची गणना देखील केली जाईल. यामध्ये बराच काळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेहमी पेक्षा चार ते पाच तास निकाल उशिराने लागेल अशी शक्यता त्यांनी वर्तविली आहे. ईव्हीएम मशीन वापरात आल्यापासून नेहमी पहिल्या तीन-चार तासांत निकालाचे कल स्पष्ट होतात आणि संध्याकाळपर्यंत निकाल स्पष्ट होतो. मात्र यंदा संपूर्ण निकालास आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे.

   Print


News - World | Posted : 2019-05-08


Related Photos