महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली पोलीस दलातील ३३ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : देशभरामध्ये पोलीस दलात किंवा इतर सशस्त्र दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमीत्य शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी सुद्धा आज १४ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला गडचिरोली पोलीस दलातील ३३ पोलीस अधिकारी व अंमलदारांना महामहीम राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक जाहीर झाले आहे. संपूर्ण देशभरात एकुण २२९ पोलीस शौर्य पदक जाहीर झाले असून, त्यापैकी गडचिरोली पोलीस दलास ३३ पोलीस शौर्य पदक ही निश्चितच गडचिरोली पोलीस दलासाठी अभिमानास्पद कामगिरी आहे. तसेच यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला २९ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक प्राप्त झाले होते. असे मिळुन यावर्षी एकुन ६२ पोलीस अधिकारी/अंमलदार यांना राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक प्राप्त प्राप्त झाले आहे.

पोलीस शौर्य पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार, १) सपोनि. रोहीत फारणे, २) सपोनि. भास्कर कांबळे, ३) सपोनि. कृष्णा काटे, ४) पोउपनि. बाळासाहेब जाधव, ५) पोउपनि. सतीश पाटील, ६) सफौ./२६२८ सुरपत वड्डे (१ BAR TO PMG), ७) सफौ./१३९९ मसरु कोरेटी, ८) पोहवा/१३८७ दृगसाय नरोटे, ९) पोहवा/२४७४ संजय वाचामी, १०) पोहवा/३०३८ गौतम कांबळे, ११) पोहवा/६६५ मोरेश्वर पुराम, १२) पोहवा/१५३१ मुकेश उसेंडी, १३) पोनाअं/३२४९ विनोद डोकरमारे, १४) पोनाअं/१९४२ कमलाकर घोडाम, १५) पोनाअं/१७८४ देविदास हलामी, १६) पोनाअं/५६५० महारु कुळमेथे, १७) पोनाअं/१२७२ चंद्रकांत ऊईके, १८) पोनाअं/६०६८ पोदा आत्राम, १९) पोनाअं/१४५६ किरण हिचामी, २०) पोअं/३५६६ दयाराम वाळवे, २१) पोअं/५२६४ प्रविण झोडे, २२) पोअं/३५३९ दिपक मडावी, २३) पोअं/५३६८ रामलाल कोरेटी, २४) पोअं/३८१० हेमंत कोडाप, २५) ३९३१ वारलु आत्राम, २६) पोअं/५२३० माधव तिम्मा, २७) पोअं/५७०० नरेश सिडाम, २८) पोअं/५९०७ रोहिदास कुसनाके, २९) पोअं/३६०२ नितेश दाणे, ३०) पोअं/५२३६ कैलास कुळमेथे, ३१) पोअं/४०८० प्रशांत बिटपल्लीवार, ३२) पोअं/७४९ मुकुंद राठोड, ३३) पोअं/५५३५ नागेश पाल यांना पदक मिळाले आहे.

वरील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मौजा मर्दीनटोला येथे झालेल्या पोलीस नक्षल चकमकीमध्ये केलेल्या यशस्वी कामगिरीची दखल घेऊनराष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक जाहीर झाले असुन, त्याबद्दल गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने त्यांचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतुक केले आहे व त्यांच्या पुढील सेवेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos