निवडणूक सुरक्षित आणि अधिक पारदर्शक करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट काढणार सॉफ्टवेअर टूल


वृत्तसंस्था / नवी दिल्ली :  निवडणूक सुरक्षित आणि अधिक पारदर्शक व्हावी यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनी एक सॉफ्टवेअर टूल काढणार आहे. ‘बिल्ड २०१९’ परिषदेत मायक्रोसॉफ्टने याबाबतची घोषणा केली. विशेष म्हणजे अमेरिकेतील दोन कंपन्यांनी हे सॉफ्टवेअर आपल्या मतदानप्रणालीमध्ये समाविष्ट करण्याची तयारीही दर्शवली आहे. हे सॉफ्टवेअर केवळ अमेरिकेसाठीच नव्हे तर जगातील सर्वच राष्ट्रांमधील निवडणुकीसाठी योग्य ठरू शकेल.हे सॉफ्टवेअर ऍप सध्या गॅलोजच्या सहाय्याने डेव्हलप केले जात आहे. गॅलोज ही कंपनी ओरेगनवर आधारलेली आहे. ती कंपनी सुरक्षित व्होटिंग प्रणाली बनवते. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी या ऍपबाबत बोलताना सांगितले की, याच वर्षात या सॉफ्टवेअरचे किट उपलब्ध होणार असून पुढील वर्षी अमेरिकेत होणार्‍या निवडणुकीत ते वापरता येईल. मायक्रोसॉफ्टद्वारे हे सॉफ्टवेअर मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.  Print


News - World | Posted : 2019-05-08


Related Photos