महत्वाच्या बातम्या

 आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवार तर्फे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या भव्य सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार, काँग्रेसचे जेष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांना महाराष्ट्रा विधानसभेची विरोधी पक्ष नेते पदी नियुक्ती झाल्याने काँग्रेसचे पदाधीकारी कार्यकर्त्यांना आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विरोधी पक्ष नेते पदी नियुक्ती झाल्याने आज गडचिरोली इंदिरा गांधी मुख्य चौकात भव्य नागरी सत्कार कार्यक्रम आयोजित केले आहे. विजय वडेट्टीवार यांच्या गडचिरोली शहरात आगमन निमित्याने ढोल तशाने जलोषत जंगी स्वागत करण्यात आली.

आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय  कंकडालवार व आविसंचे सरसेनापती तथा काँग्रेसचे नेते नंदू नरोटे यांनी सत्कार कार्यक्रमाला भेट देऊन विजय वडेट्टीवार यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून अभिनंदन देत शुभेच्छा दिले. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील व अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा केली.

यावेळी उपस्थित माजी जि.प.सदस्य अजय नैताम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, श्रीनिवास राऊत, शिवराम पुल्लूरी, मिथुन देवगडे, नरेश गर्गम, प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवार तसेच काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos