महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यात एकाच वेळेस भारतीय बौद्ध महासभेचे चिंतन शिबिराचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यात एकाच वेळेस भारतीय बौद्ध महासभेचे चिंतन शिबिराचे आयोजन. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेले दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या वतीने विज्ञानवादी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता विविध २४ प्रकारचे शिबिराचे आयोजन करण्यात येते .

चलो बुद्ध चलो बुद्ध की और या अभियानांतर्गत भारतीय बौद्ध महासभा केंद्राच्या आदेश प्रमाणे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामंध्ये बौद्धांची जनगणना, बौद्धांची सदस्यता मोहीम राबविण्या करीता भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्ह्या पश्चिम च्या वतीने सर्व तालुक्यांमध्ये एकाच वेळेस १५ ऑगस्ट २०२३ मंगळवार ला एक दिवसीय चिंतन शिबिर चे आयोजन केलेले आहे. 

या शिबिराकरीता जिल्ह्याचे पदाधिकारी तसेच वरिष्ठ केंद्रीय शिक्षक,शिक्षिका मार्गदर्शन करण्याकरता जात आहे. वरोरा तालुका/शहर मध्ये ॲड. जगदीप खोब्रागडे जिल्हा सरचिटणीस तथा केंद्रीय शिक्षक, अशोक पेरकावर लेफ्टनंट कर्नल. भद्रावती तालुका/शहर  मध्ये सुजाता लाटकर जिल्हा उपाध्यक्ष तथा केंद्रीय शिक्षिका, केंद्रीय शिक्षक शेषराव सहारे, चंद्रपूर तालुक्यात कृष्णक पेरकावर जिल्हा सचिव तथा केंद्रीय शिक्षक, भीमलाल साव जिल्हा संघटक तथा केंद्रीय शिक्षक. बल्लारपूर तालुका/शहर मध्ये सपना कुंभारे जिल्हा उपाध्यक्ष तथा केंद्रीय शिक्षिका, गुरुबालक मेश्राम जिल्हा सचिव. राजुरा तालुका/शहर मध्ये कैविस मेश्राम केंद्रीय शिक्षिका, संदीप सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष कोरपणा तालुका मध्ये नेताजी भरणे जिल्हा अध्यक्ष तथा केंद्रीय शिक्षक, प्रगती मेश्राम केंद्रीय शिक्षिका मार्गदर्शन करणार आहेत.

भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शहरातील, सर्व पदाधिकारी तसेच बौद्ध बांधवांनी बौद्धांची जनगणना अर्थात बौद्धांची सदस्यता मोहीम या मोहिमेला भरघोस प्रतिसाद द्यावा असे इंजी. नेताजी भरणे जिल्हाध्यक्ष तसेच ॲड. जगदीप खोब्रागडे जिल्हा सरचिटणीस यांनी आवाहन केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos