महत्वाच्या बातम्या

 भंडारा : तीन वर्षीय चिमुकल्या मुलाला जमिनीवर आपटून ठार मारण्याचा प्रयत्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्रात काही अशा क्राईमच्या घटना घडत असतात की, त्यामुळे लोकांना धक्का बसतो. काल सुध्दा असाच एक प्रकार भंडारा जिल्ह्यात घडला आहे.

त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील अनेक जागृत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर अशा नराधम बापाला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली आहे. एका बापाने आपल्या मुलाला जमिनीवर जोरात आपटून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी तिथे असलेल्या आईने कसे बसे बाळाला सोडवले आणि हॉस्पिटल गाठले आहे. त्याचबरोबर संतापलेल्या आईने हा प्रकार पोलिस स्टेशनमध्ये सुध्दा सांगितला. त्यानंतर पोलिसांनी त्या मुलाच्या बापाला ताब्यात घेतले आहे.

आईच्या मांडीवर खेळत असलेल्या तीन वर्षाच्या मुलाला दारुड्या बापाने ओढत नेत जमिनीवर आपटून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील विरली या गावात घडली आहे. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी आरोपी राजेंद्र गायधने या बापाला अटक केली अशी माहिती पोलिसांनी सांगितली आहे.

विरली या गावात तक्रारदार महिला आपल्या पतीसोबत राहते. राजेंद्र गायधने असे त्यांच्या पतीचे नाव आहे. राजेंद्र गायधने याला मद्यप्राशन करण्याची सवय आहे. काल १३ ऑगस्ट रोजी तो नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला. त्यावेळी त्याचा आथर्व मुलगा त्याच्या आईच्या मांडीवर बसला होता. दारु पिलेल्या राजेंद्र गायधने यांनी आपल्या मुलाला हातात उचलून घेतले आणि जमिनीवर जोरात आपटले. त्यानंतर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

तिथे असलेल्या आईने आपल्या मुलाची बापाच्या तावडीतून सुटका केली. त्याचबरोबर उपचारासाठी लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात मुलाला दाखल केले. त्यावेळी मुलाची प्रकृती नाजूक असल्यामुळे पुढील उपचारासाठी बाळाला भंडारा इथल्या लक्ष हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. लाखांदूर पोलिसांनी आरोपी बापाविरुद्ध गुन्हा करुन त्याला अटक केली आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos