महत्वाच्या बातम्या

 ग्रामपंचायत बेलगांव‌ (घाट) येथे मेरी मिट्टी मेरा देश उपक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : पंचायत समिती कोरची अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत बेलगांव / घाट च्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमांतर्गत स्मारक फलकाचे अंदाज पत्रक तयार करून तीन बाय पाच फूट स्मारक फलकाची उभारणी करण्यात आली. ११ ऑगस्ट रोजी प्रशादी हारमे गाव पुजारी यांच्या हस्ते पूजन करुन प्रशासक आर.व्ही.कोपुलवार यांच्या उपस्थितीत शीला फलकाचे अनावरण करण्यात आले. वसुधा वंदन अंतर्गत खड्डे खोदकाम करून, ७५ देशी रोपांचे नियोजन करण्यात येऊन शेतातील माती तांब्याच्या कलशात जमा करून वृक्षारोपण करण्यात आले. विरो को वंदन अंतर्गत स्वातंत्र सैनिकांना वंदन करण्यात आले. स्मृती शिल्पाजवळ सामूहिक पंचप्राण शपथ घेण्यात आली, रांगोळी स्पर्धा यासह विविध उपक्रम राबविण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायतचे प्रशासक आर.व्ही.कोपुलवार‌, सचिव के.बी.कावळे, माजी सरपंच मदन‌ कोल्हे, माजी उपसरपंच अशोक गावतूरे,माजी सदस्य मानसिंग नुरुती, तुळशीराम मडावी कोषसभा‌ समिती अध्यक्ष टाहाकाटोलारामप्रसाद हारमे कोष समिती अध्यक्ष गणेशपुर, ग्रा.पं.कर्मचारी, शिपाई मन्साराम नुरूटी, विघुत सेवक‌ किशोर हिळको, कॉम्प्युटर ऑपरेटर राजकुमार बडोले, रोजगार सेवक प्रिती नांडगाये ग्रामसभा मोबिलीझर राजोबाई‌ नुरूटी, जल सुरकशक चंद्रकांत मडावी, बचत गट (ग्रामसघ) अध्यक्ष रशिकाबाई गावतुरे, उमेद अंतर्गत, F LCRP गौतमा‌ बडोले, सरिता‌‌ नैताम, बचत गटाच्या महिला‌ व इतर गावकरी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos