नक्षल्यांनी हत्या केलेला शिशीर मंडल हा नक्षल्यांचाच खबरी : पोलिस विभागाची माहिती


- आर्थिक देवाण - घेवाणीच्या वादातून हत्या केल्याची दिली माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
आज ६ मे रोजी एटापल्ली तालुक्यातील हेडरी उपविभागातील पोलिस मदत केंद्र गट्टा जां. च्या हद्दीत गट्टा - अडंगे मार्गावर नक्षल्यांनी हत्या केलेला शिशीर मंडल  रा. बांदे (छत्तीसगड) हा पोलिसांचा खबरी नसून नक्षल्यांचाच खबरी होता. आर्थिक देवाण - घेवाणीतून झालेल्या वादात नक्षल्यांनी गोळ्या घालून त्याची हत्या केली अशी माहिती पोलिस विभागाकडू देण्यात आली आहे.
आज सकाळी ८.३०  ते ९ वाजताच्या दरम्यान शिशीर मंडल याची हत्या करण्यात आली. पोलिसांचा खबरी असल्याने हत्या केल्याची माहिती देवून नक्षली जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र मृतक हा पोलिस खबऱ्या नाही , असे पोलिस विभागाने म्हटले आहे. 
आजपर्यंत नक्षल्यांनी पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून ५२२ निरपराध नागरीकांची हत्या केली आहे. नक्षल्यांचा जिल्ह्याच्या विकासाला विरोध आहे. त्यामुळे नक्षल्यांच्या खोट्या प्रचाराला जनतेने बळी पडू नये. गडचिरोली पोलिस सामान्य जनतेच्या पाठीशी आहे, ग्रामस्थांनी नक्षल्यांना गावबंदीची मोहिम तिव्र करावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-06


Related Photos