कोंडेखल येथील सार्वजनिक विहिर समस्यांच्या गर्ते, दुषित पाण्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात


- विहिर बांधकाम करताना प्लॅटफार्मची निर्मिती नाही
- ग्रामपंचायत प्रशासनाचे दूर्लक्ष
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सावली :
तालुका मुख्यालयापासून १०  किमी अंतरावर असलेल्या कोंडेखल येथे ग्रामंचायंत अंतर्गत असलेल्या सार्वजनिक विहिरीची प्रचंड दुरवस्था असून साफसफाई न केल्यामुळे तसेच ब्लिचिंग पावडर न टाकल्यामुळे पाणी दुषित झाले आहे. पाणीटंचाईमुळे दुषित विहिरीचे पाणी भरण्याची पाळी महिलांवर आली असून आरोग्य धोक्यात आले आहे.
कोंडेखल ग्रामपंचायत अंतर्गत केशवर सहारे यांच्याघरासमोर विहिरीचे बांधकाम करण्यात आले. विहिर बांधकाम करून ४ वर्षे झाली. मात्र विहिर बांधकाम करताना प्लॅटफार्म निर्माण करण्यात आला नाही. सध्या विहिरीचे पाणी प्रचंड दुषित झाले आहे. पाण्यामध्ये जंत तयार झाले आहेत. मात्र गावातील नळयोजना बंद असल्यामुळे नाईलाजास्तव दुषित पाणी भरावे लागत असल्याची ओरड महिलांनी केली आहे. विहिरीचे पाणी प्रचंड दुषित असून पिण्याअयोग्य आहे. विहिरीभोवती पावसाळ्यात घाण पाणी साचून राहते. तेच पाणी परत विहिरीत जाते. यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ब्लिचिंग पावडर टाकण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनास कळविण्यात आले. प्लॅटफार्म बांधून देण्याची मागणी करण्यात आली. मात्र याकडे दूर्लक्ष करण्यात आले. यामुळे विहिरीची स्वच्छता करावी, प्लॅटफार्म बांधून देण्यात यावा, अशी मागणी हेमलता वालदे, पौर्णिमा वालदे, कमलबाई वालदे, सुषमा सहारे, सुमित्रा सहारे, जनाबाई भंडारे, प्रकाश सहारे, केशव सहारे आदींनी केली आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-05-06


Related Photos