जांभुळखेडा घटनेसाठी माहिती पुरविणाऱ्याचे नक्षल्यांनी मानले आभार ? रस्त्यावर लिहिला संदेश


- संदेश नक्षल्यांनीच लिहीला की अन्य कुणी, चर्चेला उत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
१ मे रोजी नक्षल्यांनी जांभुळखेडा जवळ स्फोटके पेरून पोलिस जवानांचे वाहन उडवून दिले. यामध्ये १५ पोलिस जवान शहीद झाले. तसेच वाहन चालकसुध्दा मृत्यूमुखी पडला. या घटनेनंतर रोज नवीन माहिती समोर येत असून आज कुरखेडा - कढोली मार्गावर वाघोबा देवस्थानजवळ एक संदेश लिहिलेला आढळून आला आहे. यामुळे चांगलीच खळबळ माजली असून हा संदेश नक्षल्यांनीच लिहिला की कुणी वयक्तिक राग काढण्यासाठी लिहिला वा कुण्या माथेफिरूने लिहिला याबाबत चर्चांना उत आला आहे.
रस्त्यावर ‘प्रफुल पिल्लावान,  वडसा आम्ही कुरखेडा बाॅम्बस्फोट सक्सेस केला आहे.  अशीच आम्हाला माहिती देत रहा, लाल सलाम’ अशाप्रकारचा मजकूर लिहिण्यात आला आहे. यामुळे प्रफुल पिलावान हा नेमका कोण आहे आणि नेमका हा मजकूर लिहिला कोणी याबाबत तर्क - वितर्क लढविल्या जात आहे. नक्षली आपल्याच खबर्याचा असा खुलेआम उल्लेख करू शकतात काय, हा प्रश्नसुध्दा उपस्थित होत असून कुणी माथेफिरू अथवा वयक्तिक रागातून हा मजकूर लिहिला तर नाही, असाही संशय व्यक्त केला जात आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-06


Related Photos