नक्षल्यांकडून एटापल्ली तालुक्यात पुन्हा एका इसमाची हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
नक्षल्यांचा धुमाकूळ सुरूच असून भामरागड तालुक्यातील मर्दहूर येथे एका इसमाची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच रविवारच्या रात्री एटापल्ली तालुक्यातील बांडे गावाजवळ पुन्हा एकाची नक्षल्यांनी हत्या केली आहे. या घटनांमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे.
शिशिर रामचंद्र मंडल  (४२) रा. गट्टा (जंबिया) असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. तो मोटर मॅकेनिक असल्याची माहिती आहे. गट्टा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत अडंगे ते जांबिया दरम्यान रस्त्यावर नक्षल्यांनी हत्या करून प्रेत टाकून दिले.  पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी शिशिर मंडल  याची हत्या केली आहे. शनिवारी नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील मर्दहूर गावाजवळ लग्नसमारंभातून नेवून डुंगा कोमटी वेळदा रा. नैनपूर याची नक्षल्यांनी हत्या केली होती. २४ तासात दोन नागरीकांचा नक्षल्यांनी बळी घेतल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच दुर्गम भागात नक्षल्यांची दहशत निर्माण झाली आहे. दादापूर येथील वाहने जाळपोळ, जांभुळखेडा येथील स्फोटाच्या घटनेनंतर नक्षल्यांनी भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात हत्यासत्र सुरू केले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-06


Related Photos