७ राज्यातील ५१ मतदारसंघामध्ये मतदानास प्रारंभ


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  लोकसभा निवडणुकीसाठी आज सात राज्यांमधील ५१ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मतदानाची ही पाचवी फेरी असून, त्यामध्ये ६७४ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. ८ कोटी ७५ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य आज होणाऱ्या पाचव्या टप्प्यातील मतदानात यंत्रबंद होणार आहे. 
या फेरीमध्ये महिला उमेदवारांची संख्या आतापर्यंतची सर्वाधिक आहे. या टप्प्यामध्ये सुमारे साडेतीन लाख मतदार प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.  या टप्प्यामध्ये संपुआच्या अध्यक्षा सोनिया गांधी, कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, राज्यवर्धन राठोड, जयंत सिन्हा, स्मृती इराणी, अर्जुन मेघवाल, राजीव प्रताप रुडी हे प्रमुख मैदानामध्ये आहेत. या टप्प्यात उत्तर प्रदेशातील १४ जागांवर लढाई होत असून, त्यातील १२ जागा भाजपच्या ताब्यात होत्या. सपा-बसप-आरएलडीच्या आघाडीनंतर बदललेल्या स्थितीत या जागा राखणे हे भाजपसमोर आव्हान असेल.
बिहार (५), जम्मू-काश्मीर (२),झारखंड (४), मध्य प्रदेश (७), राजस्थान (१२), उत्तर प्रदेश (१४), पश्चिम बंगाल (७) या राज्यांमधील ५१ जागांसाठी लढत होत आहे.  Print


News - World | Posted : 2019-05-06


Related Photos