भामरागड तालुक्यात नक्षल्यांकडून इसमाची हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
कुरखेडा तालुक्यातील वाहने जाळपोळ आणि भुसुरूंग स्फोटानंतर नक्षल्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास भामरागड तालुक्यातील मर्दहूर गावाजवळ एका इसमाची हत्या केल्याची घटना आज ५ मे रोजी उघडकीस आली आहे.
डुंगा कोमटी वेळदा (अंदाजे वय ३५ ) असे मृतक इसमाचे नाव असून तो नैनवाडी येथील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तो लग्नसमारंभासाठी मर्दहूर येथे आला होता. या ठिकाणी रात्रीच्या सुमारास नक्षल्यांनी येवून त्याला सोबत नेवून त्याची हत्या केल्याचे कळते. घटनेचा अधिक तपास सुरू आहे . नक्षली निवडणूकीच्या काळापासून हिंसक कारवाया करीत आहेत. पोलिस विभाग नक्षलविरोधी अभियान राबवित आहे. असे असातानाही कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे रस्ता कामावरील वाहनांना पेटवून दिल्यानंतर जांभुळखेडा गावाजवळ भुसुरूंग स्फोट घडवून आणला. यामध्ये १५ पोलिस जवान शहीद झाले होते. तसेच खासगी वाहन चालक ठार झाला होता. या घटनांमुळे जिल्ह्यात तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-05


Related Photos