महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही तहसील कार्यालयात महसूल सप्ताह कार्यक्रमाची सांगता 


- कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / सिंदेवाही : महसूल विभाग अर्तगत तहसील कार्यालय सिंदेंवाही येथे १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताह कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्तिपत्र  देण्यात आले. तसेच सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथिल विज पडुण मरण पावल्याना दोन आपतग्रस्ताना प्रत्येकी ४ लाख रूपयांचा धनादेश देण्यात आले.  इतरही लाभार्थ्यांना रेशनकार्ड, आधारकार्ड, व ईतर योजनेबाबतचे  प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले .

महसूल विभागातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांना सुध्दा सेवानिवृत्त उपदान देण्यात आले. ७ ऑगस्टला महसूल सप्ताह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

सदर कार्यक्रमाला तहसिलदार योगेश शिंदे, नायब तहसीलदार धात्रक, तुमराम, मंडळ अधिकारी तसेच तालुक्यातील सर्व तलाठी, पत्रकार, शेतकरी बाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, प्रास्ताविक सिंदेवाही तहसीलदार शिंदे यांनी केले तर आभार नायब तहसीलदार धात्रक यांनी मानले.





  Print






News - Chandrapur




Related Photos