सार्वजनिक कम्प्युटरवरून आधार कार्ड डाऊनलोड करताना सावधगिरी बाळगा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई  : 
  अथाॅरिटी युनिक आयडेंटिफिकेशन अथाॅरिटी ऑफ इंडिया ( UIDAI ) ने  ई आधार कार्ड डाऊनलोड करणाऱ्यांना सावध केले आहे. UIDAI नं ट्विट करून सांगितलंय की तुम्ही एखाद्या सार्वजनिक कम्प्युटरवरून आधार कार्ड डाऊनलोड करत असाल तर सावधगिरी बाळगली पाहिजे. आधारला फक्त UIDAIच्या eaadhaar.uidiai.gov.in या ऑफिशियल वेबसाइटवरून डाऊनलोड करा.
  UIDAI म्हटले आहे  तुम्ही सार्वजनिक कम्प्युटरवरून ई आधार डाऊनलोड करत असाल तर ही काळजी घेणं गरजेचं आहे. प्रिंट काढल्यानंतर कम्प्युटरमधली आधारची काॅपी डिलिट करा.  तुम्ही कम्प्युटरमधून फाइल डिलिट केली तरी ती रिसायकल बिनमध्ये जाते. ती कायमची डिलिट करायची असेल तर रिसायकल बिनमध्ये जाऊन डिलिट करा. नाही तर रिसायकल बिनमधून पुन्हा फोल्डरमध्ये आणता येते. म्हणूनच ती संपूर्णपणे डिलिट करा.  Print


News - Rajy | Posted : 2019-05-05


Related Photos